सुंदर आयुष्य की सुंदर स्वप्न (आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. )
एकदा लग्न झालं की , आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं ... असा वाटण्याची जागा मग , मूल झालं की ... मोठं घर झालं की ... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात , आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो . मुलांच्या वाढत्या वयात , त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो . मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल , असं आपल्याला वाटत असतं . आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की ... आपल्या दाराशी एक गाडी आली की ... आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ... निवृत्त झालो की ... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल , असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो . खरं असंय , की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही . आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच . ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्